STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Action Inspirational

आम्ही आदिवासी..

आम्ही आदिवासी..

1 min
6

 आम्ही आदिवासी.

 '. पुष्पाग्रज '

 निसर्गाची लेकरे आम्ही
 निसर्ग आमची माता,
भूवरी या जगावरी
 आमचीच खरी सत्ता...

 आम्हा आधी नाही कोणी आम्हीच खरे आदीवासी,
आले उपरे, झाले छपरे
 वैर न आमचे कोणाशी...

 डोंगर, दऱ्या, वनात राहून
 खाऊन जगतो कंद,
अंगावरती नाही कापडं
 तरीही जगण्यात आनंद...

 आम्हा न ठावे द्वेष, मत्सर
 हेवा आणि स्वार्थ,
सुख, दुःख घेतो वाटून
 आम्ही प्रामाणिक, निस्वार्थ...

 शोषीत,कष्टी,दरीद्री
 इथे अंधश्रद्धा, अज्ञान,
 अनमोल आमची शिकवण 
 तुमचे व्यर्थ भ्रष्ट ज्ञान...

 पर्यावरण रक्षक खरे
आम्ही आदिवासी जन,
कला, मूल्ये घ्या शिकूणी
 करा सृष्टीचे जतन...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror