STORYMIRROR

Chandanlal Bisen

Horror

3  

Chandanlal Bisen

Horror

स्त्री भ्रूण हत्या

स्त्री भ्रूण हत्या

1 min
681

मी करिते तुज याचना आई

गर्भ पोषण उदरी होऊ दे गं आई

मोठ्याने टाहो मी देते गं आई

नको भ्रूणहत्या करू गं आई!


तुला अशा कशा गं

मज विषयी शंका-कुशंका?

मी तुझ्याच हाडा-मासाचा गोळा

तुझेच रूप, गुण, अन् संस्कार

दिपवून टाकेल अख्खा संसार!

                                     

घाल तर मला जन्मी

नसणार गुणांची कमी

अहोरात्र परिश्रम करणार

खूप-खूप ज्ञानार्जन करणार

तेजोमय स्वकर्तुत्वाने

कुळाचे नाव रोशन करणार!


आई तू शिकलेली सवरलेली

समाजात वावरत असलेली

प्रतिष्ठेने मिरवत असलेली

दडपणाखाली निर्णय घेते कां गं?


आई तू करुणेचा अपार सागर

हृदयी तुझ्या फुटू दे पाझर

आतातरी सावर गं आई

मुलाचाच हव्यास आवर गं आई!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror