नको हा जीवघेणा संघर्ष
नको हा जीवघेणा संघर्ष
काय कसे अचानक,जगावर मोठे संकट आले,
गेला रे कोरोना म्हणता-म्हणता पुन्हा एकदा साऱ्यांना हादरविले।।
ही महामारी म्हणायची की मानवाच्या विनाशाची सुरुवात,
आता इथे आपला नाही की परका सगळ्यांचेच नंबर लागले यात।।
रोजच्या वाढत्या विस्फोटाची खबर ऐकली की मनात धास्ती वाटते,
आज ना उद्या आपण तर नाही ना होणार शिकार असे विचार मनात येऊन पोटही दुखते।।
अशी स्थिती का ओढवली याचा विचार कधी केला काय?
आपणचं नियम न पाळता कोरोनाचा रेकॉर्ड मोडलाय की काय?।।
हा 'कोरोनाचा' रोजचाच रोना आता मस्त सर्वत्र फिरतोय,
आपण आता सुद्धा कुठचा कोरोन
ा म्हणत जीव धोक्यात घालतोय।।
'मास्क'तर आपल्या गळ्यांचे अलंकार बनलेत,
सँनिटायजरच्या नावावर हातपाय स्वच्छ धुण्याचे विसरले।।
वँक्सिनचं नाव घेतलं की ताप येण्याची भीती मनी बाळगली,
पण आपल्या सवयीत सुधारणा नाही केली।।
हल्ली सारं काही कोरोनामय झालयं
नको हे दिवस म्हणून डोळ्यात पाणी आलयं।।
बाबांनो आता तब्येतीला जपा तरी,
स्थिती हाताबाहेर गेलीय रहा आपल्या घरी।।
आता आपण सारे संकल्प करूया,
सारे नियम पाळून कोरोनाला पळवुया।।
आता सारे मिळून विनवणी करू देवाला,
पुन्हा आनंदी, निरोगी जीवन लाभो साऱ्यांना।।