मलाच मी शोधताना...
मलाच मी शोधताना...


काय हरविले, काय मिळविले का कसे मज ना कळले
मलाच मी शोधताना काय मज गवसले।।
स्वप्न रूपेरी, वाट सोनेरी मन हे बावरे झूलले
काय सांगू मी कसे या स्वप्नात हरविले।।१।।
कित्येक रंग हे स्वतचेच न्हाहारताना डोळेही माझे भुलले
शोधता वाटेत स्वतः ला कित्येक पैलू मलाच माझे गवसले।।२।।
कधी कठोर,कधी उदार,कधी निर्मळ तर कधी प्रेमळ मलाच मी ना कळले,
काय शोधू अन् काय लपवू मनी प्रश्न हे सारे उठले।।३।।
मनी अंतरी ह्रदयात माझ्या नव तरंग ही उठले
शब्द ना सापडती मजला वर्णन काय करू ना सुचले।।४।।
कधी वाटे मीपणाचा हाच हेवा कधी करूण भावही जागले
भाव हे मनातले माझेच मला स्तब्ध करूनी गेले।।५।।
अनेक आशा,अनेक वाटा नव किरणही दिसले
कधी दाटे अंधार तर कधी प्रकाशमय जीवन वाटले।।६।।
सत्य-असत्य अन् काय योग्य-अयोग्य ठरविणेही कठीण मज भासले
विचारांचे काहुर मस्तकी का भिणभिणले।।७।।
कित्येक प्रश्न हे मलाच मी विचारताना तयांचे निवारण का नाही सुचले
मलाच मी शोधताना असंख्य पैलू मज गवसले।।८।।