Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RADHIKA DESHPANDE

Romance Fantasy

4.0  

RADHIKA DESHPANDE

Romance Fantasy

"तू असावे तिथे....."

"तू असावे तिथे....."

1 min
182


तू असावे तिथे सोबतीला,

प्रत्येक क्षणी माझ्या बाजूला...


वाटेत चालताना हातात हात घट्ट असावा,

सुखाचा स्पर्श त्यात भासावा...


निवांत मी, निर्भय मी असावे,

तुझ्या सोबतीने सारे भय दूर सारावे


नजरेत तुझ्या, माझ्या आनंदाची चमक दिसावी,

नजरेस दुर जाता,तुझ्या जीवा हुरहूर माझी असावी


हलकेसे स्मित हास्य तरी त्यात आपुलकी दिसावी,

एकमेकांना साह्य कराया एक नवी उमेद मिळावी...


कधी दमले मी तर विसावायला तुझा खांदा मला मिळावा,

डोळ्यांत अश्रू येता चट्कन,रुमालाचा हात तू पुढे करावा..


न बोलताही तुला माझ्या मनातले कळावे,

एकमेकांसाठी नेहमी अतूट विश्वासाचे नाते असावे


सुखदुःख तुझे सारे काही मला सांगावे,

लपाछपीचे खेळ इथे नसावे...


आधार द्यायला मी असेल नेहमीच तुझ्या सोबतीला,

चुकले मुकले तरी समजून घेऊन साथ देशील ना मला...


काय ठाऊक,काय वळण हे नशीब घेईल,

पण सुखाचे क्षण आनंदाच्या तिजोरीला तेवत ठेवेलं...


प्रत्येक क्षणी तरी एक आस असेल,

तू असावे तिथे ,जिथे मी असेलं...


Rate this content
Log in