Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RADHIKA DESHPANDE

Romance Others

4.0  

RADHIKA DESHPANDE

Romance Others

"काय पण कसे....?"

"काय पण कसे....?"

1 min
166


काय पण कसे अचानक एक दिवस असे घडले,

स्वप्न की सत्य हे मज ना उलगडले||

भोळीभाबडी मी हळुवार आवाजात कुणाशी बोलले,

काय वाटले काय कुणा पण काहीतरी बदलले||

हलकेसे स्मित हास्य, डोळ्यांत वेगळीच चमक,

आवाज सौम्य असा, सर्वत्र लखलख||

वाटले मज हे असे भास क्षणीक,

मृगजळासारखे भास हे ऐक||

पण पुन्हा काही दिवस सारखे तेच घडले,

एक ना अनेक प्रश्न मजला पडले||

चिंतीत मी,थोडे निराश अन् डगमगलेले,

हे असे विचित्र क्षण का आले||

एक दिवस मग अचानक कुणीतरी दिला इशारा,

सांगितले मला हा छळण्याचा खेळ सारा||

क्षणभराचे हे सुख,मग पुढे वादळांचा पसारा,

वेळ ना झाला खूप ,स्वतःला सावरा||

मजला भास हे कसले ,संताप हा झाला ,

सर्व भावनांचा खेळ हा मांडला||

आता मी आपलेच जगते,लोभ ना कसला ,

मी खंबीर झाले ,कायमचा विचार सुटला||

वाट रूपेरी,साथ घट्ट अशी,

भय ना कुणाचे ,चालले मी संथशी ||

भाव हे मनांचे क्षणीक सारे,

मी जगतेय आनंदाने, वाहतील सुखाचे वारे......||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance