STORYMIRROR

RADHIKA DESHPANDE

Others

4  

RADHIKA DESHPANDE

Others

आली आली दिवाळी...।।

आली आली दिवाळी...।।

1 min
272

आली आली दिवाळी...।।

दिवा-पणत्यांची आरास झाली।।

सजली दारीही रंग -रांगोळी

गोडधोडाची ही मेजवानी बनली।।ध्रु।।

आली आली दिवाळी।...

चला गायीवासरा नटवू-थटवू,

मोरपीस हारतुरे ही डोक्यावर सजली।

आली आली दिवाळी

गायी -वासरांना ओवाळी।।१।।

समुद्रमंथनातून अम्रुतकुंभ निघाले

धन्वंतरीचे आगमन झाले।

आली आली दिवाळी,

यमदीपदान संध्याकाळी।।२।।

नरकासुराचा वध हा झाला

देवहाताने मोक्ष ही लाभला

आली आली दिवाळी

 करा अभ्यंगस्नान उष:काळी।।३।।

धनधान्य लाभे सर्वदा ,

क्रुपा कुबेराची झाली।

 आली आली दिवाळी

सोनपावलाने लक्ष्मी आली।।४।।

बळीराजाचे पूजन होता

सुख शांती नांदे सर्वदा ।।

आली आली दिवाळी 

 वामन पाऊल मस्तकी पडता,

 धन्य धन्य झाला राजा बळी।।५।।

सण हा बंधू-भगिनींचा,

आहे दिस तयांच्या प्रेमसंवर्धनाचा ।।

आली आली दिवाळी 

बहीण-भावा ओवाळी।।६।।

दिवाळी सण हा आनंदाचा 

उत्सव आपुलकी जपण्याचा।।

आली आली दिवाळी

अनेकांची मनेही एकमेकांशी जुळली।।७।। 

आली आली दिवाळी.......।


Rate this content
Log in