RADHIKA DESHPANDE

Others Children


4.5  

RADHIKA DESHPANDE

Others Children


लाडके आजोबा

लाडके आजोबा

1 min 958 1 min 958

नाते अनमोल जसे 

अलगदचं जपलेले

सुरकुतलेल्या हाताने 

हळूवार स्पर्शलेले ।१।


किती कौतुक,किती प्रेम हे 

ह्रदयी माझ्या तरंग उठले

किती निर्मळ तुम्ही आजोबा

मला आपुलेसे वाटले।२।


तुमचे पिकलेले केस अन् मोठ्या मिश्या,

डोळ्यावर गोल चष्मा असलेले 

माझ्या लाडक्या आजोबांचे रूप देखणे 

ते आरामदायी खुर्चीत बसलेले।३।


सोबत असे काठी पण 

सदैव ताठ मानेने चालणारे,

देशसेवेसाठी स्वतःला झोकून देऊन 

स्वातंत्र्यसाठी झगडणारे।४।


लहानग्यांचे लाडके अन् मोठ्यांचे मार्गदर्शन करणारे

नेहमी निस्वार्थपणे 

दुसऱ्यांना मदत पुरविणारे।५।


नेहमी माझ्यासाठी 

गंमत खाऊ आणणारे

रुसलेल्या या 'सखू'ला

आपल्या विनोदांनी हसविणारे ।६।


आजोबांची शिस्त जशी 

सैन्यातील फौजीसमान वाटते

आठवणींनी तुमच्या 

डोळ्यांत अश्रू दाटते।७।


आजोबा तुम्ही का असे

दूर निघून गेले,

 साऱ्यांना आवडणारे तुम्ही कसे सोडून गेले।८।


चरणी विणवणी करील 

मी देवाला,

सदैव सुखी ठेवशील रे 

माझ्या आजोबाला।९।


आजोबा पुन्हा मला भेटायला 

स्वप्नात यालं का?

तुमच्या लाडक्या 'सखू'ला 

गोड पापा द्याल का?........।१०।


Rate this content
Log in