Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RADHIKA DESHPANDE

Romance Inspirational

3  

RADHIKA DESHPANDE

Romance Inspirational

"अनोखी ही नाळ मैत्रीची"

"अनोखी ही नाळ मैत्रीची"

1 min
164


'मैत्री' एक अतूट नातं हळुवार जपलेलं,

निःस्वार्थपणे ते आपलसं झालेलं||

मैत्री भरकटलेल्या पाखराला योग्य वाट दाखवणारी,

सुकलेल्या फुलांना बहर आणणारी||


मैत्री जी कशी हळुवार उमलते,

उन्हातही मग सावली वाटते||

अश्रूत दुःख वाहून जाते,

अन् व्यथांनाही हसू येते||


दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी मैत्री,

एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी मैत्री||

शब्दाविणा सर्वकाही समजून घेणारी ,

न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी ||


मैत्री असते पहाटेच्या दवासारखी थंडगार स्पर्श करणारी,

मैत्री असते केवड्यासारखी तना - मनात सुगंध पसरविणारी||


सूर्योदयासारखी मनाला नवचैतन्य देणारी,

झाडासारखी उन्हात राहून सावली देणारी||

मैत्री असते सोन्यासारखी तावून सुलाखून चमचमणारी,

हिऱ्यासारखी पैलू पडताचं लखलखणारी ||


ती असावी पहाडासारखी गगनाला भिडणारी,

समुद्रासारखी तळाचा थांग नसणारी||

एक सुंदर प्रवास पावसांच्या सरींचा,

एक सहवास जणू अलगद पडणाऱ्या गारांचा||


मैत्री म्हणजे नेमकं काय असतं?

एकमेकांचा विश्वास का अतूट बंधन असतं?


मैत्री म्हणजे मैत्री असते,

व्याख्या नाही तिच्यासाठी||

अतूट बंधन नव्हे तर 

असतात त्या रेशीमगाठी||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance