STORYMIRROR

RADHIKA DESHPANDE

Classics Inspirational Others

4.5  

RADHIKA DESHPANDE

Classics Inspirational Others

मिळेन मी तुझ्या आठवणींनी ..

मिळेन मी तुझ्या आठवणींनी ..

1 min
3

मिळेन मी तुझ्या आठवणींनी,
मैत्रीच्या त्या हळव्या क्षणांनी।

क्षणात मी हरवून जाई,
मनाची ही वाट तुझ्यापाशी येई॥

शब्द मुखीचे उमटले सारे,
आदराचे ते भाव न्यारे।

भास-आभास मनी तरंगती,
त्या क्षणीही जीव तुझ्याशी जुळती॥

कधी वाटे धागा नात्यांचा,
हृदयात गुंफलेला विश्वासाचा।

कधी तू दीप बनून आली,
अंधाऱ्या वाटा उजळून गेली॥

 हात धरुनी साथ दिलीस,
स्वप्नांना नवी दिशा दिलीस।

अनेक प्रश्न मनात होते,
उत्तरे त्यांची तूच दिलीस॥

 घट्ट धरून विश्वास माझा,
आधार दिलास जीवनसाचा।

आपलेपणाची ऊब देत,
मनामध्ये घर करून गेलीस॥

 सूर्यकिरणांच्या त्या वाटेवर,
मार्ग दाखविलास प्रेमभर।

नवी उमेद, नवी पहाट,
उजळून गेली जीवनवाट॥

 आज उभा आहे नव्या वळणावर,
 तुझ्या स्मृतींच्या सुंदर आधारावर।

नव्या आयुष्याची वाट धरुनी,
कृतज्ञतेने पुढे चाललो मी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics