STORYMIRROR

RADHIKA DESHPANDE

Inspirational Others

4.5  

RADHIKA DESHPANDE

Inspirational Others

नवी पहाट

नवी पहाट

1 min
1

मिटताच पापण्या डोळ्यांच्या हलकेचं भास तुझे होई, क्षणात मी गडबडुनी जागे होता, क्षण ते पुसून जाई।

मनाची ओढ ही, वाट आसवांनी बघते, शब्द मुखीच दडलेले, आतुरतेने वाट मी बघते ॥

 ्हे असे भास-आभास मनी तरंगी का व्हावे, का कुणा मी इतका जीव लावून बसावे ॥
 
कधी वाटे क्षणीक सारे, मनी प्रश्न अनेक,
हृदयात मात्र तुला गमावण्याचे दु:ख तेच एक ॥

 
कधी मी वाद तो देवासोबत का घातला,
हात जोडून तयासी मी आभारही मानला ॥

कधी परिक्षा देव तोच घेतो,
तोच आपल्याला संकटातूनी सावरतो ॥

आता मनाचे प्रश्न सारे सुटले,
 न कळणारे प्रश्नही उत्तरे देऊन गेले ॥

आता वाट सोनेरी मला ती दिसली,
आता नव्या आयुष्याची स्वप्ने मी बघत हरवून गेली ॥

घट्ट हातात हात घेऊन मला सुखाच्या वाटेवरी नेणारा कुणी गवसला,
आधार देत मजला का कधी कुणास ठाऊक आपलसा होऊनी गेला ॥

मी आता चालले सूर्यकिरणांच्या दिशेने
मार्ग दाखवेल भास्करची आता, त्याच्या सोनेरी किरणांने ॥

घेऊन निरोप आता मी वाट पुढे चाललिये,
काय बसलेत विचारात, चला नवी पहाट उजाडलीये ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational