।।लोकमान्य।।
।।लोकमान्य।।


भारतमातेचे सुपुत्र राष्ट्रौद्धारासाठी झटले,
तन-मन सारे देशसेवेत अर्पिले।।
नाव खरे 'केशव' तयांचे पण लाडाने
'बाळ'म्हणून प्रसिद्ध झाले,
आपल्या जिद्द चिकाटीने सर्वांचे लक्ष वेधले।।
संस्कृत अन् गणित प्रेमी बनले स्वातंत्र्यासाठी एक अविचल सेनानी,
लढले अनेक अडचणींशी हार ना मानली तयांनी।।
'स्वराज्य'जन्मसिद्ध हक्क असल्याचा दिला साऱ्या जनमानसाला नारा
बोल ऐकता तयांचे पेटुन उठला इंग्रजांशी लढण्या भारतवर्षही सारा ।।
अंधकारातून ज्ञानाद्वारे साऱ्यांना प्रकाशित केले
'गीतारहस्या'तून ज्ञान गीतेचे दिले।।
महान
या ग्रंथाचे निर्माण मंडालेच्या तुरुंगात केले
किती कष्ट सोसले पण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय मनी कायम ठेवले।।
लोकांनीच दिली पदवी 'लोकमान्य'ही
ते होते लेखक, वक्ते, तत्वज्ञ ,संपादक अन् उत्तम राजकारणीही।।
जहालवादी हे नेते ,
लाल-बाल-पाल या त्रिकुटातील विचार एक होते।।
केसरी मराठा व्रुत्तपत्रांतून इंग्रजांना धमकावले,
आपल्या लेखणीतून वास्तविकतेचे दर्शन लोकांना घडविले।।
गणेशोत्सव अन् शिवजयंतीला दिली मान्यता
या उत्सवातून साधली राष्ट्रीय एकात्मता।।
प्रणाम अशा थोर सुपुत्राला
भारत अमुचा धन्य-धन्य झाला।।