।।चिमुकले व्हावेसे वाटले....।।
।।चिमुकले व्हावेसे वाटले....।।


ह्रदयात माझ्या लहानपण जागले,पुन्हा एकदा चिमुकले व्हावेसे वाटले।।ध्रु।।
मायेचे ममत्व अन् पित्याचे प्रेमही दाटले,
स्वर्ग इथे मज गवसल्याचे वाटले।
पुन्हा एकदा क्षणविभोर मी,बालपण ते आठवले,
सख्यासोबत्यांसह खेळावेसे वाटले।
फुलासमवेत बागडावेसे वाटले
पक्षांसमान गाणेही गायले।
चिऊकाऊ अन् हम्मा भुभू-माँऊ म्हणावेसे वाटले,
वाट बघता तयांची वेळकाळ मी हरपले।
गोष्ट ऐकण्या आजीची मन हे आतूर झाले,
आईच्या अंगाईने स्वप्नयुगात मी हरवले।
सैर करण्या निसर्गाची बाबांस हट्ट करावेसे वाटले,
घोडा-घोडा करत तयांशी खेळावेसे वाटले।
ताईशी रुसणे-फुगणे पण पुन्हा घट्ट मिठी मारावेसे वाटले,
कधी थापा तर कधी हातावर छडीही खावेसे वाटले।
गावाकडे जाऊन नदीत डुंबावेसे वाटले,
बैलगाडीची सैर अन् पहाटेची रुणझुण ऐकावेसे वाटले।
दप्तरांचे ओझे फार ,तरी शाळेत जावेसे वाटले
गुरुजनांना आदराने नमन करावेसे वाटले।
दिवस हे सुखाचे का हरविले ,
पुन्हा ते बालपण जगावेसे वाटले।