Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RADHIKA DESHPANDE

Romance Fantasy Others

3  

RADHIKA DESHPANDE

Romance Fantasy Others

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे

1 min
187


प्रेम म्हणजे विश्वातील एक सर्वो्तम भावना,

प्रेम म्हणजे नकळत घडलेलं नव नातं ||

म्हटलं तर अथांग सागरात उठणारा लाटांचा तरंग,

म्हटलं तर रिमझिम सरींनंतर पसरणारा सप्तरंग || 

मातीतून साऱ्या नभात दरवळणारा सुगंध,

जन्मोजन्माचे हे असे अतूट बंध ||

निस्वार्थ वृत्तीने हळूवार झालेलं ते प्रेम,

कुठलीही अपेक्षा न बाळगता आपसूकचं झालेलं ते प्रेम||

तो तिथे,ती तिथे फक्त नजरेनेचं बोलणं,

हलकेसे स्मित हास्य अन् निवांत ते चालणं||

म्हटलं तर जीवाला लागलेली हुरहूर,

घट्ट असे ती मीठी न वाटे जावे दूर||

भास हा असे सारखा ,की आभास हा असे,

नसता सोबत तू परी सर्वत्र तूची दिसे||

स्वर्ग हा नवा आपलासा वाटतो,

साथ ही तुझी लाभता क्षीण हा दूर जातो||

हातात हात जिथे स्पर्श सुखाचा हा भासे,

विश्वास हा एकमेकांचा दृढ असे||

प्रेम म्हणजे एका प्रियकराने प्रियसीला दिलेली अनमोल भेट,

प्रेम म्हणजे दोघांनीही एकमेकांसाठी केलेलं संपूर्ण समर्पण||

म्हटलं तर एक धाडस,

म्हटलं तर हृदयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचा विश्वास||

प्रेम म्हणजे अपुरं ते पूर्णत्वास नेणारं ध्येय,

अमृताहूनी गोड असं ते पेय||

प्रेम म्हणजे नृत्याची छणछण,

प्रेम म्हणजे मधुर संगीताची धून||

प्रेम म्हणजे एक इंद्रधुष्य,

प्रेम म्हणजे सुरेख ते मोरपंख||

कित्ती गोडं असे ही भावना,

हवीहवीशी वाटते का काय कुणा...||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance