STORYMIRROR

Vaishali Gajananrao kadam 😘

Horror Fantasy Children

3  

Vaishali Gajananrao kadam 😘

Horror Fantasy Children

झुंज

झुंज

1 min
452

भयाण रात्र ही अंधाराची 

किरकिरणाऱ्या रातकिड्यांची

सत्यात उतरीती स्वप्न इथे 

रात्रीस जागणाऱ्या ध्येयवेड्यांची


दोन-हात करिती अभ्यासाशी 

दूर दैत्य सरती अज्ञानाचे

रात्रंदिवस खेळ चालते 

काळोख मिटविन्या गरिबीचे


अथांग जरी हा स्पर्धेचा रत्नाकर

सुरुंग लावुनी आणीतो तळ

ठेवीती सदा वृत्ती झुंजार

उफाळूनी येई रक्त सळसळ


लागे न कधी तया मनाचा तळ

अद्वितीय असे मानसिक बळ

जागृत मनी सतत जाणीव  

राबणाऱ्या जन्मदात्यांची कळ


जरी झेलती हजार संकटे 

मुखातुनी तरी शब्द ब्र न फुटे

जाणतात आपले दिनी एक 

परिस्थितीचे सारे उणे-देणे फिटे


लोकांनी ज्यांना वेड्यात काढले

त्यांनीच पुढे कोढ्यात पाडले

अध्ययनासाठी दिनरात्रीस लढले

त्यांचेच पुढे रम्य जीवन घडले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror