STORYMIRROR

Vaishali Gajananrao kadam 😘

Others

3  

Vaishali Gajananrao kadam 😘

Others

मित्र....

मित्र....

1 min
839

तुला वाटतं ना नेहमी

मी तुला कधी समजुन घेत नाही

तसं काही नाही,

    फक्त मला दाखवता येत नाही...


अरे फक्त तुझ्या एका msg वरुन कळतं मला

तु ok आहेस की नाही !!

    फक्त मला दाखवता येत नाही...


जरी सांगत असेल मी माझाच त्रास नेहमी

पण त्या पलीकडे ही असते तुझीच काळजी

    फक्त मला दाखवता येत नाही..काही?.


आहेस तु घरातील मोठा मुलगा, समजतं मला ही

Career चं टेंशन, सहन करतो तु ही, भरपूर कामे असतात तुला..... 

जाणते मी पण तुझ्या मनातील सारं काही

     फक्त मला दाखवता येत नाही...


आहे मी अल्लड थोडीशी, आणि तु समजुतदार

कळत नसेल मला दुनियादारी, पण

वेळ आल्यावर नेहमी असेन तुझ्या सोबती 

    फक्त मला दाखवता येत नाही...काही? 


वेळेनुसार..व्हावं लागेल तुझ्यापासुन दूर कधी

हक्काने समजून घेणे तुझ्या मैत्रीणी ला...... ती 

दाखवत नाही तिच दूःख तुला..........


Rate this content
Log in