दीपोत्सव
दीपोत्सव
चल ना नात्यांची दिवाळी करू साजरी ,
तू पणती हो मी होते वाती ,
टाकू तेल विश्वासाचं अन् तेवत ठेवू प्रेम ज्योती
दिवाळी चा हा आनंद सोहळा
चला करू या साजरा त्याला
मनात ना असे विचार वाईट
आले असतील जरी..
तरी त्याला करू या मोकळा .
ना बोनस, ना खरेदी, ना मिठाई
समोर दिसते ही फक्त महागाई
तरी, सर्व निराशा विसरुनी
एक नवीन आशेचा प्रकाश पडावा घरोघरी
ठेवुनी आपुलकी आणि माणुसकी
सकारात्मकतेसह साजरी करु या ही दिवाळी
