Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vaishali kadam 😘

Others

4.0  

vaishali kadam 😘

Others

भाऊ......

भाऊ......

1 min
1.7K


तुला वाटतं ना नेहमी

मी तुला कधी समजुन घेत नाही

तसं काही नाही,

    फक्त मला दाखवता येत नाही...


अरे फक्त तुझ्या आवाजावरुन कळतं मला

तु ok आहेस की नाही !!

    फक्त मला दाखवता येत नाही...


जरी सांगत असेल मी माझाच त्रास नेहमी

पण त्या पलीकडे ही असते तुझीच काळजी

    फक्त मला दाखवता येत नाही..काही?.


आहेस तु घरातील मोठा मुलगा, समजतं मला ही

Career चं टेंशन, सहन करतो तु ही, टोमणे लोकांची

जाणते मी पण तुझ्या मनातील सारं काही

     फक्त मला दाखवता येत नाही...


आहे मी अल्लड थोडीशी, आणि तु समजुतदार

कळत नसेल मला दुनियादारी, पण

वेळ आल्यावर नेहमी असेन तुझ्या सोबती दादा

    फक्त मला दाखवता येत नाही...काही? 


वेळेनुसार..व्हावं लागेल तुझ्यापासुन दूर कधी

हक्काने समजून घेणे तुझ्या बहीणी ला...... ती 

दाखवत नाही प्रेम तुला............................ 


Rate this content
Log in