थरकाप
थरकाप
रात्र काळी दाटली होती
सभोवती रातकीडयाची
किर्र किर्र काणी येत होती
भयाण रात्रीत अंगाचा थरकाप होत होता ।।1।।
झपझप पावले वेगाने
वाट काढत होती
भयाण शांततेत काळया कुट्ट रात्रीत
एका भयाने डोक्यात थैमान घातले होते ।।2।।
रात्र ती शहारणारी होती
शांत झोपला होता परिसर सारा
शांत पहुडताना सुद्धा
एका भयाने कहर माजवला होता ।।3।।

