बरसला पाऊस
बरसला पाऊस
सृष्टी सारी वाट पाही
चातका सारखी पावसाची
मात्र रुसला असावा
चाहुल देईना येण्याची ।।१।।
एवढी उसंती काबरे,
त्याने अशी घ्यावी
ओढे नद्या नाले भरुन
पाण्याची तळमळ घालवावी ।।२।।
मारलेली पावसाने दडी
आज मात्र त्याने घेतली उडी
भुतलावर येवुन त्याने
पालवी देत थांबवली नासाडी ।।३।।
आगमनाने पावसाच्या
सजली मनोमन सृष्टी
शितलतेची मंद झुळुक
देई नवी दृष्टी ।।४।।
