गुरु दैवत
गुरु दैवत
1 min
137
बोट घरुन चालविले
ज्यांनी जग दाविले
पहिले चरण त्यांचे धरावे
ज्यांनी आम्हास घडविले ।।१।।
ज्ञान दिले शिक्षकांनी
बेरीज वजाबाकी व्ययवहारी
शिक्षणाचा रचला पाया
धन्य गुरुवर्य प्रणाम त्यास करी।।२।।
जिवनाच्या वळणा वळणावर
भेटली कैक अनमोल नाती
त्यांच्या विचार उपदेशाने
जिवन सफल होत जाती ।।३।।