अख्खी रात्र
अख्खी रात्र


खुप भयंकर रात्र होती,
हवा जोरात सुटली होती,
झाडांची एकच फांदी,
जोरजोरात झोके घेत होती.
काय होतंय,
हे नेमकं कळतच नव्हतं,
हलणारी फांदी काडकण वाजली,
अन,फांदीवरचा माणूस पळत सुटला.
माणूस नव्हतच ते,
काही तरी वेगळच होत,
डोळे वेगळेच आणि हसणं वेगळच,
नेमकं काय होतंय कळत नव्हतं.
रात्र पूढे पूढे जात होती,
खूप भिती वाटत होती,
तेवढ्यात कोंबड्याने,
बाग दिली.
पक्षांची किलबिल झाली,
मला जाग आली,
आणि आख्खी रात्र,
निघून गेली.