सावज आणि शिकारी
सावज आणि शिकारी


रातीच्या अंधारात दबा धरून तो बसला
समोर येणारे सावज पाहून मनातल्या मनात तो हसला
वाट चुकलो आहे असा केला त्याने कांगावा
सावजासमोर मदतीचा केला त्याने धावा
बेसावध सावज त्याचा जाळ्यात अलगद अडकले
मिळणार आज शिकार म्हणून स्मित चेहऱ्यावर झळकले
बोलण्यातून त्याने केली मोहिनी भारी
त्याचा मागे आता चालू लागली सावजाची स्वारी
ओसाड उजाड जागेमध्ये गेला तो खास घेऊन
खिश्यातून सुरा काढून सावजाच्या मानेवर दिला ठेऊन
असेल तुझ्याकडे जे काही मौल्यवान ते खाली कर
पाठवेन सरळ वैकुंठाला जर माल नाही दिला तर
त्याचा तो पवित्रा पाहून सावज लागले हसू
>त्याचा जबड्यातील दोन लांब सुळे लागले दिसू
पाहता पाहता सावजाचे बदलू लागले रूप
ठीक ठाक माणूस जाऊन त्या जागी झाला कुरूप
पाहून तो भयाण प्रकार हातातील चाकू गेला गळून
निष्फळ प्रयन्त करून पाहिला जायचा पळून
वासून मोठा जबडा सावजाने केला मानेवर घाव
गरम उडणाऱ्या रक्तावर त्याने मारला आपला ताव
त्याचा गरम रक्तवर सावजाने भागवली आपली तहान
झाला त्याचा अंत जो समजत होता स्वतः शिकारी महान
त्याचे शरीर त्याच जंगलात आता आहे सडत
ज्या जंगलात तो लोकांचे मुडदे होता पाडत
नियतीने त्याचा भोवती असा एक फेरा रचला
स्वतः सावज शिकाऱ्याचे प्राण घेऊन गेला