ती रोजच बळी ठरते..
ती रोजच बळी ठरते..
का एकाच दिवसांपूरते
गायचे स्त्रीचे मोठेपण,
वर्षभर का चालू द्यायचे
बलात्कार नी खून ?
अबला समजून किती हा
चाले नारीचा छळ,
ती मागते न्याय, हक्क
बदलला फार काळ..
खांद्याला खांदा लावून
सर्वत्र जरी ती वावरते,
वासनांध हैवानाचा
ती रोजच बळी ठरते.
दूर्गा, अंबा म्हणून
तिचे महात्म्य जपले जाते,
सामूहिक बलात्काराची ती
रोजच शिकार होते.
या पाशवी दुनियेत
मिळेल कधी तिला न्याय ?
आहे का सुरक्षित आज
आपलीच बहीण, माय ?