पापांला वाचा फुटतेच
पापांला वाचा फुटतेच


मांजर, जरी दुध चोरून पिते,
माहित, होतेच साऱ्या जगाला!
पापाला , फुटतच असते वाचा,
भोगावी, लागतेच सजा करणीला !! 1
कुठेतरी, नोंद सलत्या काट्याची,
बोच आपल्या अंतर्मनांला !
धैर्यवान, किती ही असली तरी,
घाबरती, ती सावलीला !! 2
साथ देणारा ही, असतो गुन्हेगार,
पापामध्ये, सारखा वाटेकरी !
गुन्हा करता, नाही विचार केला,
झाले, कसे , माणुसकीचे मारेकरी !! 3
मनी सदैव ब्रम्हराक्षस,
भितीपोटी, सदैव वसवीता !
कशाला अपेक्षा,आंब्याची करता,
बाभळीची, जेव्हा बी पेरता !! 4
विश्वासघातकी,अपराध्यांना,
परमेश्वर ही कधी माफ करत नाही !
वेळप्रसंगी, या जगी, आपली
सावली ही साथ देत नाही !! 5
भुत वगैरे,काही नसते मचळी,
आपल्या, मनाचेच ते खेळ!
कर्म करावे, सदैव चांगले,
तरच बसतो, आयुष्याचा मेळ !! 6