STORYMIRROR

कुमार भयकथासूर

Horror

3  

कुमार भयकथासूर

Horror

भुताची वरात (भयकविता)

भुताची वरात (भयकविता)

1 min
412

होती अवसेच्या काळी रात आणि सोबत चांदण्याची साथ ......

अश्या राती आली दुरून भुतांची वरात .....

वेडे वाकडे नाचत आणि बेसूर होते गात .....

पण त्यात सुद्धा सोडली नाही कोणी कोणाची साथ ....

खविस होता वाजवत आणि गात होती हडळ .....

सांगाड्यानी घातली होती वस्त्रे अघळ पघळ ......

जखिणी नाचवत होत्या दिवट्या ......

त्यांना वाटे संपूर्ण वरती मध्ये त्याच आहेत बिवट्या.....

वाट दाखवण्यासाठी चकवा होता उभा ......

पुढे चालण्याची त्यालाच होती मुभा .....

ब्रम्हराक्षस होता पालखीवर धरून छत्री ....

हे काम फक्त तोच करू शकतो ह्याची होती सर्वाना खात्री .....

मानकाप्याच्या खांद्यावर होता वेताळाच्या पालखीचा भार ....

खांदा लागला दुखू अरे वेताळा थोडे तरी चाल .....

पालखी मध्ये होती वेताळाची स्वारी .....

जी सर्व सोय पाहून म्हणत होती च्यामायला लय भारी .... 

अशी निघाली होती भुतांची वरात वाजत .....

जो कोणी पाहील त्यांना घेऊन जातील खेचत .....

म्ह्णून सांगतो अवसेच्या राती पडू नका घरा बाहेर .....

नाही तरी जातील तुम्हाला घेऊन समजून घरचा आहेर..... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror