STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Horror Fantasy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Horror Fantasy

आली निवडणूक..

आली निवडणूक..

1 min
685

आली सरपंचांची निवडणूक

पिऊन खाऊन डोलू लागले लोक...


दिसतो पैशाचाच लई जोर

सुरु झाला जोरात हा प्रचार,

गहाण ठेवले साऱ्यांनी डोकं..

पिऊन खाऊन डोलू लागले लोक...


खाती शपथा देती आश्वासन

घरात,भावकित रोज भांडण

एकमेकांचे फोडती रोज डोकं..

आली सरपंचांची निवडणूक..


आज इकडे उद्या तिकडे

नाचती इकडून तिकडे माकडे

बोलती वेगवेगळं बापलेक..

पिऊन खाऊन डोलू लागले लोक..


दारु मटणाचा गांवभर वास

कसा होईल गावाचा विकास,

विचार करून दुखतय डोकं..

पिऊन खाऊन डोलू लागले लोक..


पहातोय हेच दर पाच वर्षांला

मिळेना सरपंच चांगला गावाला

बसतात बोंबलत सारेच लोक..

होऊन गेल्यावर निवडणूक...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract