मृत्यू(मरण)
मृत्यू(मरण)


जगात आलास तू कापड्या विना,
जगातून जाशील तू कापड्या विना....
ठेवी जीवनाला कितीही काचेच्या,
भांड्यात अटळ आहे रे मरण....
वाग तू सर्वांपरी प्रेमाने,नाही
जीवनाचा भरवसा नाही जीवनाचा,
भरवसा.....
अहंकार सोड तू,न गर्विष्ठ हो,
सोडून जाशील सारे विश्व......
जीवन आहे रे व्यर्थ आल्या जीवनाचा,
कर तू सार्थ कर तू सार्थ.......
मृत्यू दारात उभा, तरीही न सोडी माया,
किती कमवशील माया......
जीवन आहे रे काचेच भांड किती,
सांभाळ सांभाळ किती सांभाळ....
मृत्यू आहे अटळ पण किर्ती कर,
जगभर कीर्ती कर जगभर...✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️