STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

खुशाल यावे मरण

खुशाल यावे मरण

1 min
283


मला मरणाची भिंती नाही

पण जन्म वाया जाऊ नये,

कर्म आपल्या हाती आहे

दोष दैवाला देऊ नये.


कोणी नाही कुणाचं

आपणच जपावी नाती,

मेल्यावर काय फायदा

कोणी रडून किती...


असेल नशिब फुटके

नसेल कोणीच आपलं,

दुनिया ही बेईमानी

आपलंच सारं चुकलं.


पश्चात्ताप होतो आहे

आपल्याच चांगलं वागण्याचा,

प्रयत्न करतोय तरीही

माणूस म्हणून जगण्याचा.


नाही उरलाय भरोसा

माझाच माझ्या रक्तावर,

कोपला आहे बिचारा

देवच आपल्या भक्तांवर.


कोण्या देवाला सांग

माझी जगावेगळी कथा?

सांगतोय मीच मनाला

माझीच सारी व्यथा.


जगण्याचं माझं खरं

उरलं च काही नाही,

जगानं दिलंय मरण

माझं सरलंच काही नाही.


घेऊन स्वप्ने जगलो

स्वप्ने ती सारी अधुरी,

माझीच ही नाती..

पडली मलाच भारी.


उरला नाही जराही

देवावरी भरोसा,

माझ्याच मरणाचा

मी करु नवस कसा...


होते मला तरीही

खूप जगावयाचे,

उरले मात्र नाही

काहीच भोगावयाचे.


आता मिटावे डोळे

यावे खुशाल मरण,

पहातो आहे डोळ्यांने

माझे जळताना मी सरण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror