STORYMIRROR

Prem Gaikwad

Horror Tragedy Inspirational

3  

Prem Gaikwad

Horror Tragedy Inspirational

आत्महत्या विकृती

आत्महत्या विकृती

1 min
192

मिळालाच जन्म तर

करावं जीवनाचं सोनं,

वैतागून जीवाला उगीच

नको सोडून जग जाणं


जिद्द, चिकाटी ज्ञानाने

सर्व काही साध्य होतं,

फुकटचे नको मरण

दाखवा जगून पुरुषार्थ


काय आहे जगात या

जिवा हून या मोठं,

नसतं येत राहायला

कोणतंच संकट..


सुख, दुःख,हार,जित

नाही मनावर फार घ्यायचे

संकटावर करुन मात

हे जीवन खरं सजवायचे


मानसाला लाभले ते

बुध्दीचे महा वरदान,

लाभतो का जन्म पुन्हा

आहे अनमोल जीवन


का म्हणून मारायचं

स्वतःच वेड्या स्वतःला

जग हसत जीवन तू

तुला माणूस जन्म लाभला


कधीच माणूनये हार

जोमाने प्रयत्न कर,

घाल आकाशाला गवसणी

जग मुठीत तू हे कर


माणूस ही ओळख तुझी

तुला अजून काय हवे ?

तूच विश्वाचा शिल्पकार

घडवशील जग नवे


हसत जगावं खुशाल

का रडावे उगीच कशाला,

सार्थक जीवनाचे करावे

नको कवटाळू मरणाला


मरण हे नाही रे मुळीच

जीवन समस्येवर उपाय,

कोण म्हणेल बरा गेला

नको उगीच हाय हाय


सज्जनांची संगत हवी

सदाचार सद्वर्तन,

जगणं नाही मुळी अवघड

नको आठवू मरण.


आत्महत्या विकृती

बुध्दी भ्रष्टाची करणी,

करेल कोण क्षमा तुला

तुझा बाप,तुझी जननी?


काय हवं ते माग रे

आहे तुझं च जग सारं

चुकून ही नको डोक्यात

आत्महत्येचा विचार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror