STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

3  

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

अभिमान भारताचा...

अभिमान भारताचा...

1 min
157

आम्हा भारतीयांना खरा

आहे अभिमान भारताचा,

पराक्रमी , शूर,वीर जवान

आहे या भारतमातेचा.


देशासाठी ज्यांनी ज्यांनी

दिले आहे बलिदान,

कोटी कोटी प्रणाम त्यांना

हा भारत देश महान.


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स

होतो आहे हा साजरा,

घरोघरी फडकंतो तिरंगा

देशाभिमान हा खरा.


सहज मिळाले नाही स्वातंत्र्य

आपल्या भारत मातेला,

शूर वीरांनी दिले बलिदान

त्याग सर्वस्वाचा केला.


जगू मरु या देशासाठी

पर्वा कशाची न करु,

भारतमातेच्या पोटी आपण

मरुन पुन्हा अवतरुं.


एक सारेच भारतवासी

सारे भाऊ भाऊ,

नांदू सुखाने, बंधूभावाने

सोडून भेदभाव देवू.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract