स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
होतो आहे हा साजरा,
घरोघरी फडकतो तिरंगा
देशाभिमान हा खरा.
सहज मिळाले नाही स्वातंत्र्य
आपल्या भारत मातेला,
शूर वीरांनी दिले बलिदान
त्याग सर्वस्वाचा केला.
हुतात्म्यांची त्या ठेवा आठवण
वंदन त्यांना करा....
जगू मरु या देशासाठी
पर्वा कशाची न करु,
भारतमातेच्या पोटी आपण
मरुन पुन्हा अवतारु.
चला घेऊन हाती 'तिरंगा'
देवू ' जय हिंद ' नारा....
एक सारेच भारतवासी
सारे भाऊ भाऊ,
नांदू सुखाने, बंधुभावावने
सोडून भेदभाव देवू.
मातृभूमीच्या रक्षणार्थ
पुत्र शोभतो खरा...
साऱ्या जगात महान माझा
भारत देश असावा,
अमृतमहोत्सवी वर्षाचा या
आनंद जगाने पहावा.
देशभक्तीची देई प्रेरणा
हा तिरंगा फडफडणारा...