STORYMIRROR

Ranjana Kiran

Abstract Others

4  

Ranjana Kiran

Abstract Others

कळेल कधी रे तुला

कळेल कधी रे तुला

1 min
213

कळेल कधी रे तुला 

सोडून सर्वस्व तुला वाहिले 

नाती नवी स्वीकारून मी 

तुझ्यातच समावले 


कळेल कधी रे तुला

युगानी युगे साहते अवहेलना  

लाचारीही पदरी माझ्या

तू न जाणे माझी मनोवेदना 


कळेल कधी रे तुला

रामा तुझीच भार्या सीता मी 

भोगून वनवास पार केले अग्निदिव्य 

अखेर धरित्रीच्या उदरात स्थिरावले मी 


कळेल कधी रे तुला

पांडववधू द्रौपदी मी            

सारीपाटाचा डाव माझी बोली

नीलाजरे कुंतीपुत्र अन लज्जास्पद मी


कळेल कधी रे तुला 

गौतम ऋषिपत्नी अहिल्या मी 

नव्हेच मी पतिता

परि शिळा होऊन बसले मी


कळेल कधी रे तुला 

कलयुगातली स्री मी

अनेक स्तरांतून घेते जन्म 

तरी अत्याचाराला बळी जाते मी 


कळेल कधी रे तुला

ही माझी व्यथा

नको समजूस मज अबला

तू सोड तुझा अहंकार वृथा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract