STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract

4  

Prem Gaikwad

Abstract

जगणच माझं सरलं

जगणच माझं सरलं

1 min
231

मी ज्यांच्यासाठी जगलो

त्यांनीच मला मारलं,

मला जगायच होतं थोडं

पण जगणच माझं सरलं.


खुपच होत्या आशा

खूप होती मोठी स्वप्ने,

सारी स्वप्ने अधुरी राहिली

मरणाने मज घेरलं.


पुण्य केलं खूप,

भोगली सजा पापाची

डोळ्यात अश्रू असताना

हसू ओठांवर ते वरलं.


कुणासाठी जगाव

असं नव्हतं खरं कोणीच,

मरण जवळ ते आलं

त्यानेच जवळ धरलं.


उपकार कुणाचे असतील

ते विसरणार कधीच नाही

माप करावं त्यांनी

ज्यांनी मनात मला धरलं.


खरचं कठीण जगणे

लई मरण सोपे झाले

जगण्याचे होते स्वप्न

पण नव्हत काहीच उरलं


मी मेलो खरा मरणाणे

जगणे होते बाकी,

मज जगायचेही होते

पण नव्हत काहीच उरलं.


नकोत अश्रू डोळ्यात कुणाच्या

ही इच्छा माझी एकच,

इच्छा झालीच नाही पूर्ण

पुन्हा तुम्हीच मारलं.


मेल्यावर ही मला

समाधान एक आहे

मारणारे माझेच आहेत

नाही मरण आलं वरलं.


मी समाधान मानतोय

मरतानाही थोडं

देतोय थोड समाधान

मज मरण हे आवडलं.


हे माझ्या मारेकऱ्यांनो

तूम्ही जगा जिने खुशाल,

माझे आशिर्वाद घ्या

मी कपट नाही रे धरलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract