महाभारत
महाभारत


नको हताश
श्रीकृष्ण उपदेश
त्या अर्जुनास.
महाभारत
नको हे घडायला
सांगू जगाला.
कर निर्धार
नको घेऊ माघार
तू शूर वीर.
शस्त्र युध्दात
दावावा पुरुषार्थ
माघार व्यर्थ.
डोळे मिटले
अर्जुनास पटले
कृष्णोपदेश.
युद्धात दंग
ते कौरव पांडव
दोन्ही बांधव.
असे न घडो
पुन्हा महाभारत
कधी काळात.