अमृतमहोत्सव..
अमृतमहोत्सव..


स्वतंत्र भारताचा
होतो उत्सव साजरा,
फडकतो तिरंगा हा
अभिमान आम्हा खरा.
देशासाठी बलिदान
दिले फार हुतात्म्यांनी ,
किर्ती त्यांचीच महान
शूर वीर बलिदांनी.
जयहिंद नारा देवू
सारे आम्ही भाऊ भाऊ,
ऊंच गगनी तिरंगा
फडकत सदा ठेवू.
अभिमान भारताचा
देश जगी हा महान,
भारतमातेचा फार
आम्हा वाटे अभिमान.
करु वंदन मातेला
हुतात्म्यांना, तिरंग्याला,
स्वातंत्र्यदिनी देतो
लाख शुभेच्छा तुम्हाला.