बैलपोळा
बैलपोळा


जीवापाड आवडी
सर्जा राजा ही जोडी,
रोज जुपतो कामाला
साथ संगत न सोडी..
शेतीचा खटाटोप
बैल जोडीच्या जीवावर,
लेकरांपरीसं माया
सारा जीव जोडीवर.
जोडी कामाला भारी
लक्ष्मी आम्हा घरी,
यांच्या मुळेच मिळे
ही पोटभर भाकरी.
नाही दिला कधी
चाबकाने मार,
नाहीत फिटणार ॠण
घेऊन जन्म हजार...
बैल जोडीच्या जीवावर
केली जन्मभर शेती,
वर्षात एकच दिन की
पुजा बैलांची होती..
होई बैलांचा सन्मान
असा पहावा हा सोहळा,
आमच्या संस्कृतीची शान
हा सण बैलपोळा..