सारं काही पोटासाठी
सारं काही पोटासाठी

1 min

433
दिवसरात्र राबणे
असो भीक मागणे,
करु नये ते करणे
सारं काही पोटासाठी
चोरी,दरोडेखोरी
नको ती लाचारी,
लबाडी ती न्यारी
सारं काही पोटासाठी
रक्त हे आटवावे
दुनिया भटकावे,
देह ही विकावे
सारं काही पोटासाठी
ऊन, वारा सोसावे
देह हा झिजवावे,
किती हाल पहावे
सारं काही पोटासाठी
पदोपदी अपमान
कठीण हे जीवन,
किती जावं शरणं
सारं काही पोटासाठी