प्रेम
प्रेम


आई शपथ खरं सांगतो
मी पहिलं प्रेम तुझ्यावर केलं
पण माझं प्रेम तुझ्यावर होतं
हे तुला सांगायचं राहून गेलं
ध्यानी, मनी, स्वप्नी तूच
येईना ग झोप मुळीच,
होतोय मज भास तुझाच
लोक म्हणती वेडा मलाच
रंभा, उर्वशी, मेनका, अप्सरा
सिता,राधा, रुक्मिणी, पार्वती
अर्धांगिनी हो माझी राणी
नवी प्रेम कहाणी या जगती
तूझं चालणं, बोलणं, हसणं
साक्षात उभी तू माझ्या समोर
सत्य म्हणू का भास कळेना
तळमळतो मी रो
ज रात्रभर
गालावरची खळी तुझ्या
नी ओठावरचां तो तिळ,
पाहून तुझी ही यौवन काया
हा जीव माझा ग तळमळ
वाटे व्हावे मिलन आपले
घ्यावे रोज तुला मिठीत,
फिदा झालो तुझ्यावर राणी
पहिल्याच ग त्या भेटीत
लाजू नकोस साजनीं
ये जवळी दे आलिंगन,
स्वर्ग सुख देवू ,घेऊया
दे ओठाचं ग गोड चुंबन
प्रेम कशाला म्हणती
हे नव्हतं ग मला माहित,
तू माझी मी तुझा ग
आहे हीच खरी प्रीत...