सुखाची परिभाषा..
सुखाची परिभाषा..


कळली नाही, कळणार नाही
सुखाची खरी परिभाषा,
सारे धावती मागे सुखाच्या
पदरी शेवटी ती निराशा.
स्वार्थापोटी विश्वासघात
नाही राहिलं खरं नातं,
बेइमानी च या कलियुगात
माणूस नाही माणसात.
पाप वाढलं नको ते घडलं
फुकट खावू जमाना आला,
भ्रष्टाचार हा फारच वाढला
पैसा प्यारा ज्याला त्याला.
परोपकार,मदत,दया,माया
कुणाचा भरोसा नसे कुणाला,
सुखाची परिभाषा काय सांगू
माणूस हा कसा हैवान झाला.
आईबापाला नाही थारा
म्हातारपणी डोळ्यास धारा,
संकरीत औलाद जन्मा आली
म्हणती उपास पोटी मरा.
पैसा पैसा करती सारे
विना कष्ट हवं सुख,
कष्टकरी, शेतकरी उपाशी
केवढे मोठे आहे हे दुःख.
सुख कशात ते कुणा न कळले
सुख खरे ते कुणा न मिळले,
आयुष्य झाले बरबाद सारे
सुखासाठी किती तळमळले..