गुरू तो असतो गुरू
गुरू तो असतो गुरू


बंबची बोंबाबोंब
कुठलं ते उपटसुंभ,
झालीय जीभ लांब
फुटलं ते त्याचं तोंड...
किती तो मूर्ख हाय,
आरे तुरे बोलतो काय,
लोकप्रतिनिधी हाय
त्याची ती लायकी न्हाय...
यांना नसतात डोके
लोणी खातात बोके,
जनतेला देती धोके
लुटून भरती खोके...
मुळचे मतीमंद
केला मोबाईल बंद,
कुठे गेली ती धुंद
झाले ते तोंड बंद.
स्वतःला समजंती शहाणा
उपकार गुरुचे माना,
नाव ही लिहीता येईना
तुम्हाला गुरुविणा...
नाद करायचा नाय
गुरुचे धरा पाय,
हीच ती वेळ हाय
तोंड तू आरशात पहाय..
आम्ही जर क्रांती करु
धारेवर तुम्हाला धरु,
होईल हिसाब सुरू
गुरू तो असतो गुरू..