Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubhangi Bhosale

Abstract

4.8  

Shubhangi Bhosale

Abstract

शिक्षक -राष्ट्राचा आधारस्तंभ

शिक्षक -राष्ट्राचा आधारस्तंभ

1 min
274


ओळखलं का मला तुम्ही, 

मी एक सामान्य शिक्षक ||धृ ||

घरोघरी, दारोदारी करोना सर्वेक्षण करणारा, 

जनगणना माहिती गोळा करणारा, 

मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यत, 

शासनाला मदत करणारा ||1||

मी एक......... 

पोषण आहाराची खिचडी शिजवणारा, 

ऑनलाईनचे धडे गिरवणारा, 

आणि प्रसंगी गावातल्या मुलांसाठी जोखीम पत्करून 

वस्तीशाळेत शिक्षण देणारा, 

मातीच्या गोळ्यांना आकारणारा, 

ए. पी. जे. कलामां सारखे उत्तुंग व्यक्तीत्व, 

स्वतःच्या सावलीत घडवणारा ||2||

मी एक........ 

निरागस कोवळ्या मनाला 

जगदुनियेची सफर करवणारा, 

इवल्याशा पाखराच्या पंखात, 

राष्ट्रनिर्मितीचे बळ निर्मिणारा ||3||

मी एक..... 

जनतेचा दोष पत्करणारा, फुकट पगार, फुकट सुट्ट्या, 

अशी बिरूदे स्वतःला चिकटवल्यावरही, 

ध्येयावरील निष्ठा न ढळवणारा ||4||

मी एक..... 

समता, बंधुता भिनवणारा, 

मूल्यसंस्कारातून एकात्मतेची 

भावना रुजविणारा, 

शांत, गंभीर चेहऱ्यावर 

निर्मळ हास्य खुलविणारा ||5||

 मी एक...... 

आता मनी एकच आस, 

खातो तो घास, घेतो तो श्वास, 

उज्वल राष्ट्रनिर्मिती हाच मनी ध्यास ||7||

मी एक..... 

अजून शर्यत माझी संपलेली नाही, 

मी अजून जिंकलेलो नाही, 

राष्ट्रनिर्माण कार्यात देह माझा झिजविणार !

आणि तुमच्या स्वप्नातील भारत मीच घडविणार !

मीच घडविणार !मीच घडविणार !!

 मी एक........ 


Rate this content
Log in