STORYMIRROR

Shubhangi Bhosale

Inspirational

3  

Shubhangi Bhosale

Inspirational

जर ती नसती तर....

जर ती नसती तर....

1 min
355

शिर्षक -जर स्त्री नसती तर!

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

ती नसती तर!

गर्भाच्या काळोख्या साम्राज्यातून

तुझे अस्तित्व कधीच उगवले नसते...

ती नसती तर!उकिरड्यावरील

शिळ्या अन्नाप्रमाणे गत झाली असती तुझी 

पडला असतास खितपत रानावनात!

घेतला असता घास तुझा

हिंस्त्र श्वापदांनी!

तिच्या असण्याने अर्थ मिळाला तुझ्या जगण्याला 

ती नसती तर...

नसता भरवला कुणी काऊ चिऊ चा घास!

आईचा प्रेमळ पदर आणि उबेची शाल!

नेहेमीच तुझ्यापाठीशी तुझी संरक्षणाची ढाल!

संसारी दिली नसती कुणी पत्नी म्हणून साथ!

नसती दखल घेतली कुणी जरी असती उन्हात रापली काया!

लेक बनून कुणीच केली नसती तुझ्यावर ती माया!

बहीण म्हणून पाठीशी नसती राहिली उभी!

मैत्रीणीच्या सोबतीची न्यारीच असते खुबी!

जीवनात इंद्रधनू नात्यांचे बहरलेच नसते जर ती नसती!

ती होती म्हणून जग दुनियेची सफर केलीस बिनधास्त!

तुला माणूस म्हणून तारले तिने

ती नसती तर समाजात बदल घडला नसता..

दिला नसता अन्यायाविरुद्ध लढा झाशीच्या राणीने!

आई म्हणून जगली नसती

मदर तेरेसाच्या नावाने!

जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्मले नसते!

नसते ज्योतिबा साऊला शिकवित!

ना भिवबा क्रांतीची मशाल पेटवित!

स्त्री जातीचा आता तरी सन्मान करायला शिका..

अस्तित्व तुमचे तिच्यामुळेच आहे

हे मान्य करायला शिका!!

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational