श्रावणसरी
श्रावणसरी
पावसाने गारठलेल्या संध्याकाळची
खेड्यातली ओली चिंब पाऊलवाट
धूसर होत जाते क्षणाक्षणाने
मग माझ्या आयुष्याची वादळवाट
मी अशीच पावसात भिजताना शाहरत होते
मनातल्या भावनांना मनातच आवरत होते
तुझा हात हातात घेताना
मी स्वतःलाच सावरत होते
आतुर होतं मन माझं होकार तुझा ऐकण्यासाठी
तू मात्र निश्चित होतास नकार तुझा देण्यासाठी
तू स्तब्ध एकाकी,
मी निशब्द अबोल
जणू फांदीने झिडकरलेली
नाजूकशी वेल
बरसणाऱ्या सरीतून शोधतेय आजही तोच क्षण
नयनातील अश्रुधारातून रीत करतेय भिजलेलं ओल मन
श्रावणधारांनी वेढलेले वेदनेच कुंपण
कातरक्षणांनी मोहरलेलं अल्लड तरुण पण
प्रेमाच्या ओलाव्याचे कर ना शिंपण
आस आजही आता तरी तू हो म्हण...
