देशील का देवा माझी आई परत?
देशील का देवा माझी आई परत?
नातं असे तिचं माझं
हृदय आणि श्वास
आठवण येता तिची मला
अडतो प्रत्येक घास||धृ ||
उपकार तिचे अनंत
फेडू कसे पांग?
त्यासाठी तरी तिला
एकदा यायला सांग!||1||
मायेची ऊब मिळत नाही आता
माहेरपण सुने वाटे माहेरघरी जाता
हवा आहे आजही तिचा मायेचा पदर
थंडीतील कूस तिची ऊबदार अशी चादर||2||
आईचा आशीर्वाद नेहमी असे पाठी
अवघे जीवन समर्पित माझे तिच्या विचारांसाठी
कधी घडतील देवा आमच्या भेटीगाठी
होईल मी पण तिच्या आधाराची काठी ||3||
आई म्हणजे ईश्वराचं देणं
ऐक देवा फक्त आता माझं एक मागणं
करशील का रे एकदा आमच्या भेटी गाठी
पुन्हा एकदा जन्म मिळो फक्त तिच्याचं पोटी
पुन्हा एकदा......||4||
