STORYMIRROR

Shubhangi Bhosale

Others

3  

Shubhangi Bhosale

Others

रंग नात्यांचे!

रंग नात्यांचे!

1 min
280

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

रंग हर्षाचे उल्हासाचे

 रंग नात्यातील उत्साहाचे

 बंध मैत्रीचे जपू या चला

 चला रंग उधळू उत्सवाचे||1||

 

रंग विश्वास, आनंदाचे

 रंग मैत्री, मजा-मस्तीचे

 दोस्तांवर उडवू चला

 चला रंग उधळू उत्सवाचे||2||


 धुळवडीला उधळण रंगाची

 रंग जपू चला माणुसकीचे

 रंग लावूनि पहा एकतेचे

 चला रंग उधळू उत्सवाचे||3||

 

शिंपुनी सहवासाचे पाणी

 रंगात नाहुनी स्नेहबंधाचे 

 भिजुनी प्रेममय आठवणी

 चला रंग उधळू उत्सवाचे||4||

 

षडरिपुंना लावू सप्तरंगांचे लिंपण

 रंगात नात्यांच्या विश्वासाची गुंफण

 ऋतू पंचमीच्या रंगांना आनंदाचे शिंपण

 रंग उधळुनी भिजले घर अंगण ||5||

💚💙💜💛🧡🖤❤️🤎


Rate this content
Log in