STORYMIRROR

Jasmin Joglekar

Abstract

4  

Jasmin Joglekar

Abstract

थेंब

थेंब

1 min
224

नाजुकशा पाकळीवरचा थेंब

दाखवत होता आपला तोरा

हेलकावे देताना त्याला

काळजी घेत होता वारा


सुंदरसा तो थेंब

होता हे जाणून

त्याच्यामुळेच फूल ते

दिसत होते खुलून


कौतुकापुढे आपुल्या

कळत नव्हते काही त्याला

हिणवत होता तो

मातीत पडणाऱ्या थेंबाला


बघत होता शेजारचा थेंब

त्याचं हे असलं वागणं

कठीण नव्हतं त्याच्यासाठी

थेंबाला त्या समजावून सांगणं


मातीतल्या त्या थेंबामुळेच

उगवलंय हे फूल आज

खरं कौतुक त्याचंच आहे

करु नको तू उगा माज


ऐकून हे बोलणं

ओशाळला थेंब तो

कोणात कमी नाही हे

चांगलं समजून चुकला तो..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract