STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

4  

Jasmin Joglekar

Others

विश्वास

विश्वास

1 min
194

विश्वास.. किती महत्त्वाची गोष्ट!

आणि ताकदवानही..

या विश्वासावरच तर जग चालायचं

निदान पूर्वी तरी. 

असतीलही काही थोडेफार

तेव्हा घात करणारे..

पण तेवढ्याने तडा जात नव्हता...

तुझ्या अस्तित्त्वाला.

गुण्यागोविंदाने चालायचं जग तेव्हा..

एकमेकांवर विश्वास ठेवून.

आणि आता??

काय चाललंय कळतच नाही.

पण जगरहाटी बदललेय नक्की.

सगळं सगळं वेगळं झालंय..

पूर्वी डोळे मिटून ठेवली जाणारी गोष्ट,

आता..प्रश्न निर्माण करते

प्रथम मनात..

विश्वास ठेवावा की नाही?

पूर्वी घात करणारे असतील,

हाताच्या बोटाएवढे...

आणि आता? 

न बोललेलंच बरं.

त्या ताकदवान गोष्टीच्या शक्तीची

शंका येते आता मनात.

मग कधीतरी येतो अनुभव असाही..

जो जातो मस्त सुखावून.

मग मात्र ती चुकचुकणारी पाल,

काढून टाकावी वाटते मनातून.

'तू खरंच आहेस का?' 

या प्रश्नाऐवजी...

'तू खरंच आहेस की'..अजूनही...

खात्री वाटते अशी.

किती शक्ती आहे ना...

त्या एका वेलांटीत!

तुझ्यासारखीच


Rate this content
Log in