STORYMIRROR

Jasmin Joglekar

Others

3  

Jasmin Joglekar

Others

ती

ती

1 min
199

'ती'चा प्रवास.. 

सुरू झाला एका वेगळ्या वळणावरुन.. 

असं एक वळण की,

जे एकदम अनोळखी..

'ती'च्या आई-वडिलांना

नुसतं अनोळखीच नाही तर,

पुढची वाट धूसर असलेलं

त्या अनोळखी वळणाची

वाट माहीत असलेला 

एक मार्गदर्शक..

त्यानं योग्य दिशा दाखवली आणि..

'ती'च्या प्रवासाची सुरुवात,

त्याच वळणावरुन करायची,

ठरवलं 'ती'च्या आई-वडिलांनी


वळणापर्यंतची ती वाट..

नक्कीच होती बिकट,

पण त्यांना घडवायचं होतं

'ती'चं भविष्य..

पायापासून कमरेपर्यंत,

स्वतःला काटेकुटे टोचवत.. आई 'ती'ची शेवटी..

पोहोचली त्या वळणापर्यंत

तेच हे वळण..जिथे

'ती'च्या प्रवासाचं बीज..

रोवलं गेलं..

एका इन्क्यूबेटरमध्ये...

तिघांच्या संगनमताने


पुढची वाट दाखवायला,

उभा होताच तो मार्गदर्शक..

आता त्या बीजाला..

सोबत घेऊन चालायचं होतं

'ती'च्या आईला..

थोडं थोडकं नव्हे तर..

तब्बल नऊ महिने नऊ दिवस

चालायचं होतं आईला?? 

असं नुसतं म्हणायचं

ते नऊ महिने नऊ दिवस..

एका खोलीत, एका जागेवर

काढायचे होते तिला


पण 'ती'च्या प्रवासासाठी..

तयार झाली ती,

एका जागी थांबायला...

आणि मग अनुभवत गेली,

तिच्या पोटातून होणारा..

'ती'चा प्रवास..

सुरुवातीचा हा प्रवास..

थोडा क्लेशदायक,

शारीरिक आणि मानसिकही

पण पोटात जेव्हा 'ती'च्या..

लाथा बसू लागल्या तेव्हा,

विसरुन गेली..सगळे क्लेश


ते नऊ महिने..

एकमेकींच्या सोबतीने

कधीच पार झाले

अन् ठरली एक तारीख..

मार्गदर्शकाच्या सांगण्यावरुन

पण या जगात पाऊल टाकायची..

'ती'ला भलती घाई..

जन्मापासून पळवत ठेवलंय

सगळ्यांना 'ती'ने..

अगदी आजपर्यंत

सगळे पळताहेतही 'ती'च्या मागे..

अगदी आनंदाने


त्या वळणापासून सुरु झालेला..

त्या दोघींचा हा प्रवास..

सुफळ संपूर्ण झालाय,

असं वाटतंय..'ती'च्या आईला

ते केवळ 'ती'ने..

पळत येऊन मारलेल्या..

एका निरपेक्ष, गोड..

मिठीमुळं..


Rate this content
Log in