STORYMIRROR

Jasmin Joglekar

Inspirational

3  

Jasmin Joglekar

Inspirational

अनाहूत

अनाहूत

1 min
244

कसे काय जाणे कळालेच नाही कधी हा अनाहूत आला घरी

खुणा पावलांच्या दिसू लागल्या त्या तशी जाहले कावरी बावरी

किती भ्यायले मी मनातून माझ्या तरी द्यायचा ठाम होता लढा

कसा घालवावा कळेना मलाही मनाच्या अघोरी भितीला तडा


किती ही निराशा छळे का उदासी कळेना मनी होत गेले द्विधा

अनाहूत त्या पाहुण्यानेच नेली घरातून ही सौख्य शांती क्षुधा

तरीही मनातून विश्वास जागा न शंका कधी घेतल्या मी उगा

उभारी सग्यांची तनाला मिळाली तसा आसरा ना दुजा हा उभा


किती संकटेही जरी येत गेली तरीही अबाधित ठेऊ मती 

कशाला उगा यातना या मनाला करू योग्य आत्ताच काही कृती

नवे साल येईल घेऊन आशा सुगंधीत वाहेल वारा नवा

नको संकटांची मनी फार भीती नवे वर्ष आणि सुखाची हवा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational